पाकिस्तानविरोधातील ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पहिल्या हल्ल्यात पाच दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. ७ मे रोजी मध्यरात्री भारताने पाकिस्तानातील बहावलपूर आणि मुरीदके येथील दहशतवादी तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या पाच प्रमुख दहशतवाद्यांचा खात्मा झाला. भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.