अमृतसरमधील मंदिरावर ग्रेनेड हल्ला करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
पंजाबच्या अमृतसरमधील खांडवाला येथे ठाकुरद्वारा मंदिराबाहेर तीन दिवसांपूर्वी ग्रेनेड हल्ला झाला होता. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी ग्रेनेड फेकून पळ काढला. सोमवारी पोलिसांनी एका हल्लेखोराला चकमकीत ठार केले, तर दुसरा फरार आहे.