भिन्नधर्मीयांमधील जमिनीच्या व्यवहारांना पोलिसांची परवानगी आवश्यक, आसाम सरकारचा निर्णय!
आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी जाहीर केले की, आसाममध्ये वेगवेगळ्या धर्माच्या व्यक्ती वा गटांमध्ये होणाऱ्या जमिनींच्या व्यवहारांसाठी आसाम पोलिसांचं ना हरकत प्रमाणपत्र सक्तीचं करण्यात आलं आहे. राष्ट्रीय सुरक्षा व सामुदायिक सौहार्दाच्या दृष्टीने हा निर्णय आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. या निर्णयामुळे देशभरात चर्चा सुरू झाली असून, धर्माच्या आधारावर आर्थिक व्यवहारांमध्ये नियम लागू करता येऊ शकतात का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.