CCTV:कारवाईच्या नावाखाली पोलिसांनी घेतला तरुणाचा जीव; “माझ्या मुलाची..”, वडिलांचा टाहो!
भोपाळमध्ये २२ वर्षीय उदित गायके या तरुणाची दोन पोलिसांनी मारहाण करून हत्या केल्याची घटना घडली. उदित नुकताच बंगळुरूतील आयटी कंपनीत नोकरी मिळाल्याचा आनंद मित्रांसोबत साजरा करत होता. पोलिसांनी त्याला हटकलं आणि मारहाण केली, ज्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी दोन पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.