गायिका मैथिली ठाकूर यांचा भाजपात प्रवेश, ‘या’ जागेवरुन निवडणूक लढवणार?
गायिका मैथिली ठाकूर यांनी मंगळवारी भाजपात प्रवेश केला आहे. बिहार निवडणुकीत त्या अलीनगरमधून निवडणूक लढवू शकतात. विद्यमान आमदार मिश्रीलाल यादव यांचं तिकिट कापलं जाण्याची शक्यता आहे. मैथिली ठाकूर यांचा मोठा चाहता वर्ग आहे, ज्याचा फायदा भाजपाला होऊ शकतो. त्यांनी भाजपाचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांची भेट घेतली होती. मैथिली ठाकूर या लोकप्रिय गायिका असून त्यांनी विविध भाषांमध्ये गाणी गायली आहेत.