१० टक्के कमिशनमुळे गेले १५ चिमुकल्यांचे जीव; ‘कोल्ड्रिफ’साठी डॉक्टरनं घेतले होते पैसे!
गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त 'कोल्ड्रिफ' कफ सिरप प्रकरणात अनेक नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. डॉ. प्रवीण सोनी यांनी हे कफ सिरप रुग्णांना देण्यासाठी संबंधित कंपनीकडून १० टक्के कमिशन घेतल्याचा दावा पोलीस विभागाने केला आहे. या सिरपमुळे १५ मुलांचा मृत्यू झाला आहे. श्रीसेन फार्मास्युटिकल कंपनीला टाळं ठोकण्यात आलं असून, तामिळनाडू सरकारने कंपनी बंद करण्याचे आदेश दिले आहेत.