‘पृथ्वीवर पुन्हा जन्म घेणार नाही’, सीए असलेला तरूण हताश, भावनिक पोस्ट लिहून संपवलं जीवन
दिल्लीतील एका तरुण सीएने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. धीरज कंसल या तरुणाने एअरबीएनबीवर फ्लॅट भाड्याने घेऊन हेलियम वायू श्वासोच्छवासाद्वारे घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने फेसबुकवर भावनिक पोस्ट लिहिली, ज्यात त्याने मृत्यूला सुंदर म्हटले आणि आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार धरू नये असे नमूद केले.