डोनाल्ड ट्रम्प हमासवर संतापले; इस्रायलला दिली मोकळीक, म्हणाले, “संपवून टाका…”
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गाझामधील दहशतवादी संघटना हमासवर संतापले आहेत. इस्रायल आणि हमास यांच्यात दोन वर्षांहून अधिक काळ संघर्ष सुरू आहे. इस्रायलच्या लष्करी कारवाईमुळे हजारो लोकांचे प्राण गेले आहेत. हमास शस्त्रविरामाबाबत सकारात्मक पावले उचलत नाही. अमेरिकेच्या चर्चेच्या प्रस्तावाला हमासने नकार दिल्यामुळे ट्रम्प संतापले आहेत.