हरियाणा : IPS अधिकाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी DGP सह १३ पोलिसांविरोधात गुन्हा दाखल
हरियाणा पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन कुमार यांच्या आत्महत्येप्रकरणी चंदीगड पोलिसांनी हरियाणाचे पोलीस महासंचालक शत्रुजीत सिंह कपूर यांच्यासह १३ पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पूरन कुमार यांनी सुसाइड नोटमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मानसिक छळ व जातीय भेदभाव केल्याचा आरोप केला होता. त्यांच्या पत्नी अमनीत पी. कुमार यांनी तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई झाली.