India Air Strike: ऑपरेशन सिंदूर आणि मनोवैज्ञानिक रणनीती; भारतीयांनी काय करणं अपेक्षित आहे?
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून ९ ठिकाणी एअर स्ट्राईक केला, ज्यात जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीनचे तळ उद्ध्वस्त झाले. या कारवाईमुळे दहशतवाद्यांच्या नेटवर्कला मोठा धक्का बसला. या संपूर्ण कारवाईमध्ये 'मनोवैज्ञानिक रणनीती' महत्त्वाची ठरली. भारतीयांनी या रणनीतीला बळी न पडण्यासाठी काय करावं, हे महत्त्वाचं आहे.