“माझी हत्या झाली आहे..”; राजा रघुवंशीच्या अंत्ययात्रेतील पोस्टरने वेधलं लक्ष
इंदौरच्या राजा रघुवंशीच्या अंत्ययात्रेत "माझा मृत्यू नव्हे, माझी हत्या झाली आहे" अशा आशयाचे पोस्टर्स झळकले. राजा आणि त्याची पत्नी सोनम ११ मे रोजी विवाहबद्ध झाले होते. २३ मेपासून दोघांचा कुटुंबाशी संपर्क तुटला. २ जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह १५० फूट खोल दरीत सापडला. सोनम अद्याप बेपत्ता आहे. राजाच्या कुटुंबीयांनी सीबीआय तपासाची मागणी केली आहे.