मोसादच्या तीन गूप्तहेरांना इराणनं दिली फाशी, ७०० जणांना अटक; शस्त्रसंधी होताच मोठी कारवाई
इराण आणि इस्रायल यांच्यात अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्धविराम झाल्यानंतर इराणने देशांतर्गत कारवाई सुरू केली आहे. इस्रायलच्या मोसादशी संबंध असल्याचा आरोप ठेवत इराणने तीन जणांना फाशी दिली आहे. तसेच ७०० जणांना अटक करण्यात आली आहे. फाशी दिलेल्या तीन लोकांनी इस्रायलच्या मोसादशी संबंध ठेवत हत्यारांची तस्करी केल्याचा आरोप आहे. इराणमध्ये सर्वाधिक मृत्यूदंडाच्या शिक्षांमध्ये चीननंतर दुसरा क्रमांक आहे.