इराण-इस्रायल युद्ध विरामानंतर अयातुल्ला खामेनींचा पहिलीच प्रतिक्रिया; अमेरिकेला दिला इशारा
इराण-इस्रायलच्या १२ दिवसांच्या संघर्षानंतर युद्धविराम जाहीर झाला. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी इस्रायलवर विजय मिळाल्याचा दावा करत अमेरिकेला पुन्हा इशारा दिला. त्यांनी अमेरिकेच्या कतारमधील हवाई तळावर केलेल्या हल्ल्याचा उल्लेख केला आणि इराणच्या हल्ल्याची क्षमता अधोरेखित केली.