ट्रम्पना बैठकीतच आली चिठ्ठी आणि २ तासांत झाली शांततेची घोषणा; नेमकं काय लिहिलं होतं?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल-गाझा युद्धबंदीबाबत २० कलमी शांतता प्रस्ताव मांडला होता. गुरुवारी दोन्ही देशांनी या प्रस्तावाच्या पहिल्या टप्प्याला मान्यता दिल्याचं ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल साईटवर जाहीर केलं. याआधी भारत-पाकिस्तान संघर्षातही त्यांनी मध्यस्थी केल्याचा दावा केला होता. ट्रम्प यांना अंतर्गत सुरक्षा मंत्री मार्को रुबियो यांनी चिठ्ठी दिल्यानंतर त्यांनी तातडीने ही घोषणा केली.