केरळ नव्हे ‘हे’ राज्य आहे भारतातील पहिलं पूर्ण साक्षर राज्य
ULLAS अंतर्गत संपूर्ण साक्षर राज्य: केरळला सर्वाधिक साक्षर राज्य मानलं जातं, पण संपूर्ण साक्षर राज्य कोणतं? हा प्रश्न आता मिटला आहे. भारताचं पहिलं पूर्ण साक्षर राज्य मिझोराम ठरलं आहे. शिक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली असून, ULLAS - नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत मिझोरामला अधिकृतपणे पूर्ण साक्षर राज्य घोषित केलं जाणार आहे. ऐझॉल येथे होणाऱ्या कार्यक्रमात मान्यवर ही घोषणा करतील.