निशिकांत दुबेंची मुंबईत कोट्यवधींची मालमत्ता, फ्लॅटबाबत ‘ही’ माहिती समोर
महाराष्ट्रात हिंदी विरुद्ध मराठी भाषिक वाद निर्माण झाला आहे. ठाकरे बंधूंनी हिंदी सक्तीला विरोध केला. भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली. दुबे यांचे मुंबईत खारमध्ये कोट्यवधींचे फ्लॅट आहे. त्यांनी मराठी माणसावर टीका करताना मुंबईतील वास्तव्याचा विसर पडल्याचे दिसते. सचिन अहीर यांनी दुबे यांच्यावर टीका केली आहे.