भारतीय वंशाचे नोबेल विजेते अभिजीत बॅनर्जी पत्नीसह अमेरिका सोडणार; डोनाल्ड ट्रम्प कारणीभूत?
नोबेल पुरस्कार विजेते अभिजीत बॅनर्जी आणि त्यांची पत्नी एस्थर डुफ्लो हे झुरिच विद्यापीठात (स्वित्झर्लंड) काम करण्यासाठी जाणार आहेत. तेथे ते अर्थशास्त्रासाठी नवीन केंद्र स्थापन करणार आहेत. २०१९ साली बॅनर्जी आणि त्यांची पत्नी डुफ्लो यांनी 'जागतिक गरिबी दूर करण्यासाठी प्रायोगिक दृष्टीकोन' यासाठी संयुक्तपणे नोबेल पुरस्कार जिंकला होता. त्यांच्या अमेरिका सोडण्याच्या निर्णयाची चर्चा होत आहे.