जम्मू-पंजाब-राजस्थानच्या सीमावर्ती भागात आता परिस्थिती काय?
भारत-पाकिस्तान तणाव शांत झाल्यानंतर जम्मू काश्मीर, पंजाब आणि राजस्थानच्या सीमावर्ती भागात परिस्थिती पूर्ववत झाली आहे. सायरनचे आवाज थांबले असून जनजीवन सुरळीत झाले आहे. लोक आपल्या घरी परतत आहेत. पंजाब आणि राजस्थानमध्येही शांतता परतली आहे. सीमावर्ती भागात वीजपुरवठा पूर्ववत झाला असून, जनजीवन सामान्य झाले आहे.