नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”
भारताने पाकिस्तानला दहशतवादाला खतपाणी घालणं थांबवण्याचा इशारा दिला आहे, अन्यथा नकाशावरून मिटवू असं म्हटलं आहे. यावर पाकिस्तानने प्रतिक्रिया देत म्हटलं की, त्यांचं सैन्य शत्रूच्या घरात घुसून लढण्यास सक्षम आहे. पाकिस्तानी लष्कराने भारताच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर प्रतिक्रिया देत, भविष्यातील संघर्ष विनाशकारी ठरू शकतो असं म्हटलं आहे.
 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 