मोदींची ‘मन की बात’ हिंदीसह मराठीतूनही; पंतप्रधानांच्या आवाजात कार्यक्रम व्हायरल!
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हिंदी विरुद्ध मराठी वाद सुरू असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात' कार्यक्रम मराठीतून शेअर केला आहे. @NaMoInMarathi या अधिकृत अकाऊंटवरून ३२ मिनिटांचा हा कार्यक्रम शेअर करण्यात आला आहे. मोदींनी आंतरराष्ट्रीय योग दिन आणि आणीबाणीच्या काळातील परिस्थितीवर भाष्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही पोस्ट रीशेअर केली आहे.