CBSE दहावी-बारावीचा निकाल लागल्यानंतर पंतप्रधान मोदींची परीक्षा योद्धांसाठी खास पोस्ट
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. दहावीच्या परीक्षेत ९३.६६% विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर बारावीच्या परीक्षेत ८८.३९% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना त्यांच्या जिद्द, शिस्त आणि मेहनतीचे कौतुक केले. त्यांनी पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या यशात सहभागी असलेल्या सर्वांचे आभार मानले.