‘राहुल गांधीही लोकशाहीसाठी लढतायत’, नोबेल शांतता पुरस्कारावरून काँग्रेस नेत्याचं विधान
व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाल्यानंतर, काँग्रेसने राहुल गांधींची तुलना मचाडो यांच्याशी केली. काँग्रेस प्रवक्ते सुरेंद्र राजपूत यांनी राहुल गांधी संविधान वाचविण्यासाठी लढत असल्याचे सांगितले. भाजपाने या विधानावर टीका करत राहुल गांधींना नोबेल मिळण्याची मागणी विचित्र असल्याचे म्हटले. भाजपाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी राहुल गांधींवर टीका केली.