“राजा भाई तुम तो गये”, लग्नाआधीच्या कार्यक्रमात अँकर गंमतीने जे म्हणाला तेच ठरलं खरं!
इंदूरच्या व्यावसायिक राजा रघुवंशीची हत्या त्याची पत्नी सोनम आणि तिचा कथित बॉयफ्रेंड राज कुशवाहा यांनी तीन सुपारी किलर्सच्या मदतीने केली. ११ मे रोजी सोनम आणि राजाचं लग्न झालं होतं. २३ मे रोजी शिलाँगमध्ये राजाची हत्या करण्यात आली. २ जूनला राजाचा मृतदेह सापडला. सोनमने गुन्हा कबूल केला असून, ती पोलिसांच्या ताब्यात आहे. या दोघांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात अँकर जे गंमतीने म्हणाला ते शब्द खरे ठरले आहेत.