Indigo च्या विमानात उंदरामुळे तीन तास गोंधळ, प्रवासी बाहेर; शेवटी अधिकाऱ्यांनी केलं निवेदन
सोमवारी कानपूरहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात उंदीर आढळल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. विमानतळ प्रशासनाने तातडीने कारवाई करून प्रवाशांना खाली उतरवले आणि उंदराला शोधून बाहेर काढले. या प्रक्रियेमुळे विमानाचे उड्डाण तीन तास उशीराने झाले. विमानाची संपूर्ण तपासणी करूनच पुन्हा उड्डाणाची परवानगी देण्यात आली.