आंध्र प्रदेशच्या वेंकटेश्वर मंदिरात मोठी चेंगराचेंगरीत; ९ भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती
आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील काशीबुग्गा येथील वेंकटेश्वर मंदिरात शनिवारी सकाळी चेंगराचेंगरी होऊन नऊ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जखमी झाले. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सदर घटनेनंतर दुःख व्यक्त केले आणि जखमींना तातडीने उपचार देण्याच्या सूचना दिल्या. ही घटना राज्यातील तिसरी मोठी चेंगराचेंगरीची घटना आहे. यापूर्वी तमिळनाडू आणि बंगळुरूमध्येही अशा घटना घडल्या होत्या.