दहशतवाद्यांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, भारताने पुरावे दाखवत पाकिस्तानचा बुरखा फाडला
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या हल्ल्यांबद्दल माहिती दिली. पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला, ज्यात १६ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आणि एक लष्करी अधिकारी शहीद झाला. भारताने प्रत्युत्तर देत लाहोरमधील रडार डिफेन्स सिस्टिम नष्ट केली. मिस्री यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचे पुरावे दाखवले आणि पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना शासकीय इतमामात अंत्यसंस्कार देण्याची पद्धत असल्याची टीका केली.