गुटखा थुंकण्यासाठी दरवाजा उघडला अन् अनर्थ घडलं; एकाचा जागीच मृत्यू, तीनजण गंभीर जखमी
सोमवारी पहाटे बिलासपूर-रायपूर महामार्गावर भीषण अपघातात एका कापड व्यापाऱ्याचा मृत्यू झाला आणि तीनजण गंभीर जखमी झाले. इनोव्हा गाडीचा चालक गुटखा थुंकण्यासाठी दरवाजा उघडल्याने गाडी उलटली. व्यापारी जॅकी गेही जागीच मृत झाला. आकाश आणि पंकज गंभीर जखमी झाले. हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पोलिस तपास करत आहेत.