“मोदींमुळेच आपल्या परराष्ट्र धोरणाला कणा, त्याआधी…”, अमित शाहांचं विधान; केली तुलना!
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना देशाच्या आधीच्या पंतप्रधानांशी केली आहे. मोदींच्या आधी भारताच्या परराष्ट्र धोरणाला कणाच नव्हता, असं शाह म्हणाले. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मोदींच्या काळात देशासाठी मोठ्या गोष्टी साध्य झाल्याचं सांगितलं. शाह यांनी पंडित नेहरूंशी मोदींची तुलना करत, मोदींमुळे परराष्ट्र धोरण खंबीर झाल्याचं नमूद केलं. पाकिस्तानविरोधात त्वरित प्रत्युत्तर देण्याची तयारीही त्यांनी अधोरेखित केली.