“…तर अमेरिकेत येण्यावर कायमची बंदी घालू”, अमेरिकेचा भारतीयांना थेट इशारा
भारतातील अमेरिकन दूतावासाने अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतराबद्दल इशारा दिला आहे. अमेरिकेत अधिकृत मुक्कामाच्या कालावधीपेक्षा जास्त काळ राहिल्यास हद्दपार होण्याची आणि भविष्यात अमेरिकेत प्रवेशावर कायमची बंदी येण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या नवीन धोरणानुसार, ३० दिवसांपेक्षा जास्त काळ राहणाऱ्या परदेशी नागरिकांना संघीय सरकारकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. व्हिसा फसवणुकीत दोषी आढळल्यासही अमेरिकेत प्रवेशावर बंदी येईल.