८५०,००० वर्षांपूर्वी मुलांचे मांस खाणार्या ‘या’ मानवी पूर्वजांचा इतिहास नेमकं काय सांगतो?
अतापुएरका याच भागात असलेल्या ग्रॅन डोलिना या गुहेत अभ्यासकांना एका मुलाच्या मानेचे हाड सापडले असून त्या हाडावर कापल्याच्या खुणा आहेत. या नव्या शोधामुळे होमो अँटेसेसर नावाची मानवाची प्रजाती नरभक्षक होती, या पूर्वीच्या सिद्धांताला बळकटी मिळाली आहे. ही प्रजाती स्वतःच्याही मुलांच्या मांसाचे भक्षण करत होती.