९ वर्षांपूर्वीचा उरी दहशतवादी हल्ला; तेव्हा नेमके काय घडले होते?
१८ सप्टेंबर २०१६ रोजी उरी येथे भारताच्या लष्करी तळावर झालेला हल्ला हा भारताच्या आधुनिक इतिहासातील आजवरचा सर्वात भीषण दहशतवादी हल्ला मानला जातो. त्या दिवशी पहाटेच्या वेळेत झालेल्या या हल्ल्यात जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (LoC) असलेल्या भारतीय लष्कराच्या ब्रिगेड मुख्यालयाला दहशतवाद्यांकडून लक्ष्य करण्यात आले. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात १९ भारतीय जवान शहीद झाले आणि ३० हून अधिक जखमी झाले होते. या घटनेस आज नऊ वर्षे उलटली.