माणूस मेल्यानंतर त्याच्या आठवणींचं पुढे काय होतं? विज्ञान काय सांगतं?
आठवणी कधी वस्तूच्या रूपाने जपल्या जातात, तर कधी अश्रूंच्या माध्यमातून. जे मागे राहिले आहेत त्यांना किमान त्यांच्या स्मृतीचा आधार असतो. परंतु, जे जग सोडून गेले आहेत, त्यांचं काय? …त्यांच्या आठवणींचं नेमकं काय होतं? त्या मृत व्यक्तीच्या विचारांना, अनुभवांना आणि आयुष्यातील क्षणांना पुन्हा प्राप्त करता येत का? याचाच शोध संशोधकांनी घेतला आहे. काही आठवणी मृत्यूनंतरही जतन करता येतात, असे मत संशोधक व्यक्त करतात. परंतु ही प्रक्रिया जटिल आहे. त्यात काही महत्त्वाचे टप्पे पार पाडावे लागतात.