कफ सिरपमुळे लहान मुलांचा मृत्यू: पालकांनी काय काळजी घ्यावी? काय करावे?, काय टाळावे ?
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये दूषित कफ सिरपमुळे लहान मुलांचे मृत्यू झाल्यानंतर पालकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. आता मुलांना कफ सिरप द्यावा की नाही?, हा प्रश्न अनेकांच्या मनात घर करून बसला आहे. बहुतांश वेळा लहान मुलांना होणारा सर्दी-खोकला स्वतःहून बरा होणारा (self-limiting) असतो, त्यामुळे सहा वर्षांखालील मुलांना कफ सिरप देण्याची बिलकुल गरज नसते, असे तज्ज्ञ डाॅक्टरांना वाटते.
 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 