‘भैरवी सुरू झाली’, दशावतार चित्रपटातील अखेरच्या संवादाचा अर्थ काय?
कोकणातील राखणदार हा वेतोबा, भैरोबा अशा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. हातात घुंगरू असलेली काठी, पायात चामड्याची चप्पल, खांद्यावर घोंगडी असे काहीसे राखणदाराचे रूप असते. भक्ती, शक्ती आणि भीती तसेच गूढता असे आगळे वेगळे समीकरण आपल्याला राखणदाराच्या संकल्पनेत पाहायला मिळते. त्याच निमित्ताने कोकणातील राखणदाराची हजारो वर्षांची परंपरा नेमकं काय सांगते? याचा घेतलेला आढावा.