Gold price forecast: अस्थिर परिस्थितीत सोन्यातील गुंतवणूक किती फायदेशीर?
सोने हा मौल्यवान धातू अलीकडे खूपच महाग झाला आहे. भारतात एमसीएक्सवर १० ग्रॅम सोन्याचा भाव अलीकडेच १ लाख रुपयांवर पोहोचला. हा भाव वाढण्यामागे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी लावलेले जादा आयात शुल्क, व्यापारयुद्धाचा धोका, आंतरराष्ट्रीय तणाव आणि त्यामुळे वाढलेली महागाई तसेच या साऱ्याचे जागतिक अर्थव्यवस्थेवरील परिणाम ही मुख्य कारणे आहेत. बाजारात अनिश्चितता आणि जोखीम वाढली की, गुंतवणूकदार सोन्याकडे सुरक्षित पर्याय म्हणून पाहतो.