किडनीच्या कॅन्सरमुळे उद्भवते भयावह स्थिति; लघवीतून रक्तप्रवाह…
किडनींवर कर्करोगाचा घाला पडतो, तेव्हा परिस्थिती किती भयावह होऊ शकते याची कल्पनाच अंगावर शहारे आणते. लघवीत रक्त दिसू लागतं, सततची वेदना आणि थकवा अंग झिजवत नेतात… आणि नकळत आयुष्याचा ताबा हातातून निसटतो. मधुमेह, स्थूलता, उच्च रक्तदाब, धूम्रपान आणि व्यायामाचा अभाव… या सगळ्या टाळता येण्याजोग्या सवयीच आज मूत्रपिंड कर्करोगाचं मोठं कारण ठरल्या आहेत. आपण आत्ताच सावध झालो नाही, तर येत्या दशकांमध्ये या आजाराचं प्रमाण आणि मृत्यूदर दुपटीने वाढेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.