कतरिना कैफ आणि विकी कौशल आई बाबा होणार! वयाच्या चाळीशीनंतरही गर्भधारणा होऊ शकते?
Katrina Kaif Pregnancy: बॉलीवूडचं लोकप्रिय कपल कतरिना कैफ आणि विकी कौशल लवकरच आई-बाबा होणार आहेत. लग्नाला चार वर्षं झाल्यानंतर आणि बऱ्याच चर्चेनंतर ही दोघं आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करण्यास तयार आहेत. या कपलनं एकत्र इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ही गोड बातमी शेअर केली. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं “आनंद आणि कृतज्ञतेनं भरलेल्या अंतःकरणासह आम्ही आमच्या आयुष्यातील सर्वोत्तम अध्याय सुरू करायला निघालो आहोत ”