लिव्हर डोनेट करताय? थांबा! पुण्यात लिव्हर ट्रान्सप्लांटनंतर नवरा बायकोचा मृत्यू
Liver Donor Risks: लिव्हर डोनरचा मृत्यू होणं ही खूपच दुर्मीळ बाब असते. पण पुण्यात नुकतीच या संदर्भातील एक दु:खद घटना घडलीय, ज्यात ४२ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. तिनं नवऱ्याला यकृताचा एक भाग दान केल्यानंतर तिला कमी रक्तदाब आणि शरीरातील एकाच वेळी अनेक महत्त्वाचे अवयव नीट काम करणे थांबणं (मल्टी-ऑर्गन फेल्युअर) अशा आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या. त्या घटनेनंतर लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत की, यकृत प्रत्यारोपण (लिव्हर ट्रान्सप्लांट) प्रक्रिया खरंच सुरक्षित आहे का?