हार्ट अटॅकसाठी डोक्यातले नेगेटिव्ह विचार कारणीभूत ठरतात का? तज्ज्ञ काय सांगतात?
आपण दुःखी असतो त्यावेळी अनेकदा छातीवर काहीतरी दडपण असल्याचं जाणवतं. आपल्या मनासारखं नाही झालं किंवा प्रेमभंग झाला तर आपण हृदयावर आघात झाला, असं म्हणतो किंवा हार्ट ब्रेक (heartbreak) झालंय, असं सहजच इंग्रजीत बोलून जातो आणि जेव्हा आनंदी असतो, तेव्हाही म्हणतो, “माझ हृदय भरून आलं आहे!” इतकं सगळं असूनही आपण हृदयाला फक्त रक्त पंप करणारं यंत्र समजतो. पण खरं पाहिलं, तर हृदय हे आपल्या भावनांचं प्रतिबिंब आहे. म्हणूनच, वैद्यकशास्त्र सांगतं की, मन आणि हृदय हे स्वतंत्र नसून परस्परांवर परिणाम करणारे दोन भाग आहेत.