जास्वंदाच्या रोपाला दररोज येतील नवीन फुले! चहापावडरची ‘ही’ ट्रिक करा फॉलो
Jaswand Flower Growing Tips: जास्वंदाचं रोप घरी असावं असं सगळ्यांनाच वाटतं. श्रीगणेशाचं आवडतं फूल म्हणजे जास्वंद. घरी बाप्पाची पूजा करताना आपल्या बागेत फुललेलं एखादं तरी फूल चरणावर वाहावं अशी अनेकांची इच्छा असते. याच इच्छेपोटी आपण बाजारातून जास्वंदाच्या फुलांची रोपं आणतो, त्याला वेळोवेळी सूर्यप्रकाश व पाणी देऊन त्याची निगासुद्धा राखतो, रोप तुम्ही लावलेल्या लहानश्या कुंडीत बहरत जातं, त्याला अगदी टवटवीत पाने येतात, पण कळ्या? कळ्या मात्र काही केल्या येतच नाहीत. अशावेळी काय करावं हे आज आपण पाहणार आहोत.