“इथे मराठीच…”, मराठी बोलण्यास नकार देणाऱ्यांबद्दल अजित पवार यांनी मांडली स्पष्ट भूमिका
अजित पवार यांनी मराठी भाषेच्या वादावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, महाराष्ट्रात मराठी भाषेला प्राधान्य दिले पाहिजे. अजित पवार म्हणाले की, प्रत्येक राज्यातील मातृभाषा महत्त्वाची आहे, परंतु हिंदी आणि इंग्रजी भाषाही महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी शिकण्याचा प्रयत्न करावा आणि मराठी येत नसेल तर तसे नम्रपूर्वक सांगावे.