“हे कोण करतंय हे न कळण्याइतके आम्ही मूर्ख आहोत का?” ठाकरे गटाचा संतप्त सवाल
दिशा सालियन हत्या प्रकरणावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये खडाजंगी झाली. शिवसेना (उद्धव ठाकरे) आमदार अनिल परब यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, सविस्तर चौकशीची मागणी केली आहे. अनिल परब यांनी मनीषा कायंदेंवर टीका करत, आदित्य ठाकरेंना क्लीनचिट मिळाल्याचे सांगितले. विरोधी पक्ष कमजोर असल्याने त्याला दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.