बहिणीला मित्राबरोबर लॉजमध्ये पाहून भाऊ खवळला, मित्रावर केला वार; बहिणीने काढला पळ
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात तीन महाविद्यालयीन तरुणी मित्रांसह लॉजवर गेल्या होत्या. एका तरुणीच्या भावाला माहिती मिळताच तो तिथे पोहोचला आणि वाद झाला. घाबरलेल्या तरुणीने उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला, ज्यात ती जखमी झाली. भावाने बहिणीच्या मित्राला चाकूने जखमी केले. तरुणींनी तक्रार दिल्यावर तीन तरुणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.