देवेंद्र फडणवीसांचं राज ठाकरेंना उत्तर, “विद्यार्थी आपल्या देशातली एखादी अधिकची भाषा…”
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध करत पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सरकारला दोन पत्रं पाठवली असून, तिसरं पत्र राज्यातील शाळांना पाठवणार असल्याचं सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत केंद्र सरकारच्या तीन भाषांच्या धोरणाचं समर्थन केलं. त्यांनी सांगितलं की, तज्ज्ञांच्या चर्चेनंतर हे धोरण आणलं आहे आणि महाराष्ट्र दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही.