देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधींवर जोरदार टीका, “निवडणुका हरल्याने त्यांच्या मनावर…”
राहुल गांधी सध्या अमेरिकेतील बोस्टनमध्ये आहेत आणि ब्राऊन विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने तडजोड केल्याचा आरोप केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडाडून टीका केली आहे. फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी परदेशात जाऊन भारताची आणि लोकशाही संस्थांची बदनामी करत आहेत. त्यांनी जनतेत जाऊन काम करावे आणि भारताची बदनामी थांबवावी.