राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंबाबत बाळा नांदगावकर यांची भावनिक पोस्ट, “राजकारण होत राहिल पण..”
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गणेश चतुर्थीनिमित्त मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे उपस्थित होते. या भेटीमुळे ठाकरे बंधूंच्या मनोमीलनाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मनसे नेते बाळा नांदगांवकर यांनी या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. राजकीय पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व दिले जात आहे.