“माणिकराव कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडीओ..”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडीओ आमदार रोहित पवार यांनी पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. कोकाटे यांनी व्हिडीओ जाहिरात असल्याचे स्पष्टीकरण दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बाब अयोग्य असल्याचे म्हटले. जितेंद्र आव्हाड यांनीही कोकाटे यांच्यावर टीका करत आणखी व्हिडीओ पोस्ट केले.