राज ठाकरेंचा प्रश्न; “गुजरातमध्ये हिंदी सक्ती नाही, मग महाराष्ट्रावर ही भाषा का लादत आहात?
महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय घेतल्याबद्दल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सरकारला पाठवलेल्या पत्रांचा उल्लेख करत हिंदीकरणाच्या विरोधात संघर्ष अटळ असल्याचे सांगितले. गुजरातमध्ये हिंदी सक्ती नाही, मग महाराष्ट्रात का? असा सवाल त्यांनी केला. मराठी अस्तित्व टिकवण्यासाठी हिंदी सक्तीला विरोध करण्याचे आवाहन त्यांनी केले.