‘एकनाथ शिंदे – उद्धव ठाकरेही एकत्र येऊ शकतात’, शिवसेनेच्या मंत्र्याचे मोठे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात 'कुणीही कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो' हे वाक्य प्रसिद्ध आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे १८ वर्षांनी एकाच मंचावर आलेले दिसले. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना गमतीत बोलत असताना सत्तेत येण्याचे आवाहन केले. आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही राजकारणात कोणतेही चित्र कायम नसते असे सांगितले असून भविष्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र दिसतील, असे म्हटले.