महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखच्या अटकेनंतर रोहित पवारांनी व्यक्त केला संशय; म्हणाले..
आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी अवैध शस्त्रांच्या तस्करी प्रकरणात अटक केली. राजस्थानमधील पपला गुर्जर टोळीशी संबंध असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवला आहे. मोहाली पोलिसांनी चार जणांना अटक केली, ज्यात सिकंदरचा समावेश आहे. मात्र, सिकंदरला फसवण्यात आल्याचा आरोप त्याचे कुटुंब आणि आमदार रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांनी महाराष्ट्र सरकारने सिकंदरवर अन्याय होऊ नये यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले आहे.